हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १७ :
द्विविवाहाबद्दल शिक्षा :
या अधिनियमाच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक लावण्यात आलेला दोन हिंदूमधील कोणताही विवाह हा, जर अशा विवाहाच्या दिनांकास कोणत्याही पक्षाला हयात पती किंवा पत्नी असेल तर, शून्य असेल अणि तदनुसार भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) यातील ४९४ व ४९५ या कलमाचे उपबंध लागू होतील.