Hma 1955 कलम १५ : घटस्फोटित व्यक्तींना पुन्हा केव्हा विवाह करता येईल :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १५ :
घटस्फोटित व्यक्तींना पुन्हा केव्हा विवाह करता येईल :
जेव्हा घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्यात आलेला असेल आणि एकतर हुकूमनाम्याविरुद्ध अपिलाचा अधिकार नसेल किंवा असा अपिलाचा अधिकार असल्यास अपील करण्याची मुदत अपील सादर न होता संपून गेलेली असेल किंवा अपील सादर केलेले असेल पण काढून टाकण्यात आले असेल तेव्हा, विवाहतील कोणत्याही पक्षाने पुन्हा विवाह करणे कायदेशीर होईल :
१.(***)
——-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम १० द्वारे परंतुक गाळले.

Leave a Reply