Hma 1955 कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १३-क :
१.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष :
या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीमध्ये, जेथे विनंतीअर्ज कलम १३ पोट-कलम (१) चे खंड (दोन), (सहा) आणि (सात) उल्लेखिलेल्या कारणांवर आधारित असेल अशी प्रकरणे खेरीजकरुन एरव्ही, घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद् करण्यासंबंधीचा अर्ज झाल्यावर न्यायालय, त्या प्रकरणातील परिस्थितरीचा विचार करता त्याला तसे न्याय्य वाटल्यास्, घटस्फोटाऐवजी न्यायिक फारकतीचा हुकूमनामा करु शकेल.)
———-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ७ द्वारे कलम ८ द्वारे घातले.

Leave a Reply