Hma 1955 कलम १० : न्यायिक फारकत :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १० :
न्यायिक फारकत :
१.(१) विवाह या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो त्यातील कोणत्याही पक्षाला, कलम १३ पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणत्याही कारणास्तव, न्यायिक फारकतीचा हुकूमनामा मिळण्यासाठी विनंतीअर्ज सादर करता येईल आणि पत्नीच्या बाबतीत, ज्या कारणांस्तव घटस्फोट मिळवण्यासाठी विनंतीअर्ज सादर करता आला असता अशी कारणे म्हणून त्या कलमाच्या पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणांच्या आधारेही तिला असा न्यायिक फारकतीचा हुकूमनामा मिळविण्यासाठी विनंतीअर्ज सादर करता येईल.)
२) न्यायिक फारकतीचा हुकूमनामा देण्यात आला असेल त्याबाबतीत, त्यानंतर उत्तरवादीबरोबर दांपत्यभावाने राहणे विनंतीअर्जदारावर बंधनकारक असणार नाही, पण कोणत्याही पक्षाने विनंतीअर्जाद्वारे अर्ज केल्यावर आणि अशा विनंतीअर्जात केलेल्या निवेदनांच्या सत्यतेबाबत खात्री झाल्यावर जर न्यायालयास तसे न्याय्य व वाजवी वाटेल तर, त्यास हुकूमनामा विखंडित करता येईल.
———
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ४ द्वारे मूळ पोट-कलम (१) ऐवजी घातले.

Leave a Reply