Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम ६२ : अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याला अडथळा आणण्यासाठी किंवा तोतयागिरी केल्याबद्दल शास्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६२ :
अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याला अडथळा आणण्यासाठी किंवा तोतयागिरी केल्याबद्दल शास्ती :
जर कोणतीही व्यक्ती, कोणत्याही सबळ कारणाशिवाय अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यास या अधिनियमाद्वारे नेमून दिलेल्या कामकाजात अडथळा आणेल, विरोध करेल किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल, तोतयेगिरी करेल, धमकी देईल, धाकदपटशा करेल किंवा अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यास मारहाण करेल तर ती व्यक्ती तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.

Exit mobile version