Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम ५ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची रचना आणि त्याचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्रता :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ५ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाची रचना आणि त्याचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्रता :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरणामध्ये एक अध्यक्ष आणि निम्नलिखित बावीस सदस्य असतील, ज्यापैकी एक तृतीयांश महिला असतील, अर्थात :-
(a) क) सात असे सदस्य जे निम्नलिखित शी संबंधित केन्द्र सरकारच्या मंत्रालयांचे किंवा विभागांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी केन्द्र सरकार द्वारा नियुक्त केले जातील आणि ते भारत सरकारच्या सहसचिव या पदापेक्षा खालच्या पदाचे नसतील :-
एक) कृषी (शेती),
दोन) वाणिज्य,
तीन) ग्राहक बाबी,
चार) अन्न प्रक्रिया (खाद्य प्रसंस्करण),
पाच) आरोग्य (स्वास्थ्य)
सहा) वैधानिक बाबी (विधी बाबी),
सात) लघु उद्योग,
जे पदिय सदस्य असतील;
(b) ख) अन्न (खाद्य) उद्योगातील दोन प्रतिनिधी असतील ज्यात एक लघु उद्योगातील असेल;
(c) ग) ग्राहक (उपभोक्ता) संस्थांतील दोन प्रतिनिधी असतील;
(d) घ) तीन प्रख्यात अन्न (खाद्य) तंत्रवैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ असतील;
(e) ङ) राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रथम अनुसूचित विनिर्दिष्ट परिमंडळ किंवा क्षेत्रामधून (झोनमधून) प्रत्येक कम्रानुसार तीन वर्षाच्या आळीपाळीने नियुक्त केलेले पाच सदस्य असतील;
(f) च) कृषी (शेती) संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन व्यक्ती असतील;
(g) छ) किरकोळ विक्रेते संघटनेचे प्रतिनित्व करण्यासाठी एक व्यक्ती असेल.
२) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि अन्य सदस्य अशा रीतीने नियुक्त केले जातील की जे अन्नाच्या (खाद्याच्या) मानकाची उच्चतम क्षमता देऊ शकतील, जे प्रस्तुत तज्ञांनी व्याप्त असतील व जे देशातील अधिकांश संभाव्य भौगोलिक वितरणाच्या दृष्टीकोनातून प्रतिनिधित्व करीत असतील.
३) केन्द्र सरकार द्वारे अध्यक्षाची नियुक्ती अन्न (खाद्य) विज्ञान क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींमधून किंवा प्रशासनातील अशा व्यक्तींमधून केली जाईल जे त्या विषयाशी संबंधित असतील आणि ज्यांनी भारत सरकारच्या सचिवच्या अन्यून पद धारण केले आहे किंवा केलेले असेल.
१.(४) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य, पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त अंशकालीन सदस्यांसह, निवड समितीच्या शिफारशींवर केन्द्र सरकारद्वारे नियुक्त केले जातील.)
५) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचा अध्यक्ष अन्य कोणतेही पद धारण करणार नाही.
———
१. २००८ चा अधिनियम क्रमांक १३ याच्या कलम ३ द्वारा मूळ पोटकलमाऐवजी समाविष्ट केले.

Exit mobile version