Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम ४३ : प्रयोगशाळा, अनुसंधान (संशोधन संस्था) आणि संदर्भ अन्न (खाद्य) प्रयोगशाळा यांची मान्यता आणि अधिकृती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
प्रकरण ८ :
अन्न (खाद्य) पदार्थाचे विश्लेषण :
कलम ४३ :
प्रयोगशाळा, अनुसंधान (संशोधन संस्था) आणि संदर्भ अन्न (खाद्य) प्रयोगशाळा यांची मान्यता आणि अधिकृती :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरण या अधिनियमा अंतर्गत अन्न (खाद्य) विश्लेषकांद्वारे नमुन्यांचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय प्रमाणीकरण बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त एजन्सीद्वारे मान्यताप्राप्त अन्न प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांना सूचित करू शकेल.
२) या अधिनियमाद्वारा किंवा त्याखाली केलेल्या कोणतेही विनियम आणि नियमांद्वारे संदर्ग अन्न (खाद्य) प्रयोगशाळेकडे सोपविण्यात आलेली कार्ये पार पाडण्यासाठी अन्न (खाद्य) प्राधिकरण अधिसूचनेद्वारे एक किंवा अधिक संदर्भ अन्न (खाद्य) प्रयोगशाळा स्थापित करील किंवा मान्यता देईल.
३) अन्न (खाद्य) प्राधिकरण निम्नलिखित बाबी विनिर्दिष्ट करणारे विनियिम करील, अर्थात,-
(a) क) अन्न (खाद्य) प्रयोगशाळा आणि संदर्भ अन्न (खाद्य) प्रयोगशाळा यांची कार्ये आणि त्यांच्या कार्याचे स्थानिक क्षेत्र किंवा क्षेत्रे ज्यांत अशी कार्ये केली जाऊ शकतात;
(b) ख) अन्न (खाद्य) पदार्थांचे नमुने विश्लेषण आणि परीक्षणाकरिता उक्त प्रयोगशाळेत सादर करण्याची प्रकिया, त्यावरील प्रयोगशाळेच्या अहवालांचे स्वरुप आणि अशा अहवालांच्या संदर्भात देय शुल्क (फी); आणि
(c) ग) उक्त प्रयोगशाळेला तिची कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी अशा इतर बाबी ज्या आवश्यक किंवा समर्पक असतील.

Exit mobile version