Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम ४० : खरेदीदाराद्वारे अन्नाचे (खाद्याचे) विश्लेषण केले जाणे :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ४० :
खरेदीदाराद्वारे अन्नाचे (खाद्याचे) विश्लेषण केले जाणे :
१) या अधिनियमातील कोणतीही गोष्ट, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याव्यतिरिक्त, अन्न (खाद्य) पदार्थाचा खरेदीदारलाही अन्न (खाद्य) विश्लेषकाकडून योग्य ती फी भरुन विश्लेषण करुन घेऊ शकण्यास व विनियमांत विहित केलेल्या कालावधीत अन्न (खाद्य) विश्लेषकाचा विश्लेषण केलेला अहवाल प्राप्त करुन घेण्यास प्रतिबंध करते असे मानण्यात येणार नाही :
परंतु असे की, असा खरेदीदार अन्न (खाद्य) पदार्थाची खरेदी करताना अन्न (खाद्य) व्यावसायिकाला त्याचा अन्न (खाद्य) पदार्थ विश्लेषण करुन घेण्याच्या इराद्याबद्दल माहिती देइल :
परंतु आणखी असे की, जर अन्न (खाद्य) विश्लेषकाच्या अहवालावरुन असे दिसून आले की अन्न (खाद्य) पदार्थ हा या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे किंवा विनियमांचे पालन करत नाही, तर खरेदीदार या कलमान्वये त्याने भरलेली शुल्क (फी) परत मिळण्यास पात्र असेल.
२) जर अन्न (खाद्य) विश्लेषकाला कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाचा नमुना हा या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियम व विनियम यांच्या तरतुदींचे उल्लंघन करीत असताना आढळला तर अन्न (खाद्य) विश्लेषक, कलम ४२ च्या तरतुदींनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी विश्लेषण अहवाल निर्देशित अधिकाऱ्याकडे पाठविल.

Exit mobile version