Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम ३० : राज्याचे अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ३० :
राज्याचे अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त :
१) राज्य सरकार, अन्न (खाद्य) सुरक्षा आणि मानके आणि या अधिनियम आणि याखाली केलेल्या नियम आणि विनियमांना अधीन अधिकथित इतर आवश्यकता यांची कार्यक्षम अंमलबजावणी करण्यासाठी राज्यासाठी अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्ताची नियुक्ती करील.
२) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त निम्नलिखित सर्व किंवा कोणतीही कार्य पार पाडील, अर्थात :-
(a) क) लोक स्वास्थ्याच्या (आरोग्याच्या) हितास अनुसरुन कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थाचे उत्पादन, साठवण, वितरण किंवा विक्री यास संबंध राज्यात किंवा त्याच्या कोणत्याही क्षेत्रात किंवा त्याच्या भागात अशा कालावधीकरिता, जो एक वर्षाहून अधिक नसेल, व जो शासनाच्या राजपत्रात अधिसूचनेद्वारा अधिसूचित केला असेल त्याप्रमाणे प्रतिबंधित करील;
(b) ख) राज्यात अन्नाचे (खाद्याचे) उत्पादन किंवा प्रक्रिया करणाऱ्या औद्योगिक एककांचे सर्वेक्षण करणे जेणेकरुन हे माहीत होईल की, हे एकक अन्न (खाद्य) पदार्थाचे उत्पादन किंवा प्रकिया करताना अन्न (खाद्य) प्राधिकरणाद्वारे अधिसूचित केलेल्या वेगवेगळ्या अन्न (खाद्य) पदार्थाच्या मानकांचे पालन करत आहेत किंवा नाही;
(c) ग) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी व्यापक प्रमाणावर अन्न (खाद्य) सुरक्षेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अन्न (खाद्य) साखळीच्या विविध विभागांच्या संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे किंवा चालविणे;
(d) घ) यथाविनिर्दिष्ट मानके आणि इतर आवश्यकतांची प्रभावी आणि एकरुप कार्यवाही सुनिश्चित करणे आणि वास्तविकता, दायित्व, व्यावहारिकता, पारदर्शिता आणि विश्वासनीयता यांची उच्च मानके सुनिश्चित करणे;
(e) ङ) या अधिनियमान्वये कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधांसाठी खटला चालविण्यास मंजुरी देणे;
(f) च) राज्य सरकार, अन्न (खाद्य) प्राधिकरणाशी सल्लामसलत करुन विहित करील अशी इतर कार्ये.
३) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त आदेशाद्वारे, त्याच्या अधीनस्थ असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला या अधिनियमान्वये त्याचे अधिकार आणि कार्ये (अभिहित (पदनिर्देशित) अधिकारी, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी आणि अन्न (खाद्य) विश्लेषक यांची नियुक्त करण्याचा अधिकार वगळता) आदेशात यथाविनिर्दिष्ट अटी व बंधनांना अधीन राहून, त्याला आवश्यक वाटतील अशी सूपूर्द करु शकेल.

Exit mobile version