Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम २८ : अन्न (खाद्य) पदार्थ परत मागविण्याची प्रक्रिया :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम २८ :
अन्न (खाद्य) पदार्थ परत मागविण्याची प्रक्रिया :
१) अन्न (खाद्य) व्यवसायिकास त्याने प्रकिया केलेले, उत्पादन केलेले किंवा वितरण केलेले अन्न (खाद्य) या अधिनियमास किंवा याखाली केलेल्या नियमांचे किंवा विनियमांचे तरतुदीस अनुसरुन नाही असे वाटेल किंवा तसे समजण्यास त्यास कारण असेल तर तो तत्काळ अशी उत्पादने बाजारातून काढून घेण्याची किंवा ग्राहकांकडून मागे मागविण्याची प्रक्रिया आरंभ करील आणि यासंबंधी सक्षम प्राधिकाऱ्यास माहिती कळवील.
२) अन्न (खाद्य) व्यवसायिकाने बाजारात आणलेले अन्न (खाद्य) ग्राहकांसाठी असुरक्षित आहे असे त्यास वाटत असल्यास किंवा त्याला विश्वास ठेवण्याचे कारण असल्यास तो तशी माहिती सक्षम प्राधिकऱ्यांना त्वरित कळविल व त्यांना सहकार्य करील.
३) अन्न (खाद्य) व्यवसायिक त्याने ग्राहकांचा धोका टाळण्यासाठी योजलेल्या उपायांची माहिती सक्षम प्राधिकाऱ्यांना देईल व कोणत्याही व्यक्तीस या अधिनियमास अनुसरुन सक्षम प्राधिकाऱ्यांना अन्नाची (खाद्याची) जोखीम टाळण्यास, कमी करण्यास किंवा दूर करण्यास मदत होईल असे सहकार्य करण्यास प्रतिबंध किंवा परावृत्त करणार नाही.
४) प्रत्येक अन्न (खाद्य) व्यवसायिक अन्न (खाद्य) परत मागविण्याच्या कार्यपद्धतीतील, अन्न (खाद्य) प्राधिकरणाने विनियमाद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या अटी आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करील.

Exit mobile version