Site icon Ajinkya Innovations

Fssai कलम १३ : वैज्ञानिक मंडळ (पॅनल) :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १३ :
वैज्ञानिक मंडळ (पॅनल) :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरण स्वतंत्र विज्ञान तज्ञांचे बनलेले एक वैज्ञानिक मंडळ स्थापन करेल.
२) वैज्ञानिक मंडळ संबंधित उद्दोग आणि ग्राहक प्रतिनिधींना त्याच्या चर्चेसाठी आमंत्रित करेल.
३) पोटकलम (१) च्या तरतुदींवर कोणताही प्रभाव न पडू देता, अन्न (खाद्य) प्राधिकरण निम्नलिखित बाबींकरिता आवश्यकतेप्रमाणे वैज्ञानिक मंडळा व्यतिरिक्त अन्य वैज्ञानिक मडळांची स्थापना करेल, अर्थात :-
(a) क) अन्न (खाद्य) समावेशी, स्वाद, प्रक्रियेचे सहाय्यक आणि अन्न (खाद्य) संपर्क घटक (अन्नाच्या सानिध्यात येणारे पदार्थ);
(b) ख) किटक नाशके व प्रतिजैकि पदार्थाचे अवशेष;
(c) ग) अनुवांशिकरित्या सुधारित जीव आणि अन्न (खाद्य);
(d) घ) कार्यात्मक अन्न (खाद्य), न्यूट्रास्युटिकल्स, आहारातील उत्पादने आणि इतर तत्सम उत्पादने;
(e) ङ) जैविक धोके (जैविक परिसंकट);
(f) च) अन्न (खाद्य) श्रृंखलेतील संदूषके;
(g) छ) लेबल लावणे; आणि
(h) ज) नमुने घेणे आणि विश्लेषणाच्या पद्धती.
४) अन्न (खाद्य) प्राधिकरण वेळोवेळी यथास्थिति, नवीन सदस्य जोडून किंवा विद्यमान सदस्य बरखास्त करुन किंवा मडळाचे नाव बदलून वैज्ञानिक मंडळाची पुर्नस्थापना करु शकेल.

Exit mobile version