Fssai कलम ६७ : अन्न (खाद्य) पदार्थाच्या आयातीबाबत या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दलची शास्ती ही इतर कोणत्याही अधिनियमात प्रदान केलेल्या शास्ती व्यतिरिक्त असेल :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६७ :
अन्न (खाद्य) पदार्थाच्या आयातीबाबत या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दलची शास्ती ही इतर कोणत्याही अधिनियमात प्रदान केलेल्या शास्ती व्यतिरिक्त असेल :
१) कोणतीही व्यक्ती, जी या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियम व विनियमांचे उल्लंघन करुन अन्न (खाद्य) पदार्थाची आयात करत असेल ती व्यक्ती परकीय (विदेशी) व्यापार (विकास आणि नियमन) अधिनियम १९९२ (१९२२ चा २२) आणि सीमाशुल्क अधिनियम १९६२ (१९६२ चा ५२) या द्वारे ज्या शास्तीस पात्र असेल त्या व्यतिरिक्त या अधिनियमान्वये शास्तीत पात्र ठरेल व त्यानुसार त्यावर कारवाई केली जाईल.
२) कोणताही असा अन्न (खाद्य) पदार्थ नष्ट केला जाईल किंवा परकीय (विदेशी) व्यापार (विकास आणि नियमन) अधिनियम १९९२ (१९९२ चा २२) किंवा सीमाशुल्क अधिनियम १९६२ (१९६२ चा ५२) किंवा यथास्थिती, इतर अधिनियमान्वये कार्यक्षम पदाधिकाऱ्याने परवानगी दिल्यास तो आयात दाराला परत दिला जाईल.

Leave a Reply