अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ३७ :
अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी :
१) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, अधिसूचनेद्वारे, केन्द्रसरकारने विहित केलेल्या अर्हतेप्रमाणे जे पात्र असतील अशा अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्यांची, त्यांना नेमून देईल अशा स्थानिय क्षेत्रासाठी नियुक्ती करील व त्यांना या अधिनियमानुसार व त्याखाली बनविलेल्या विनियम व नियम याप्रमाणे विहित केलेली कार्ये ठरवून देईल.
२) राज्य सरकार, राज्य सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याला पोटलकम (१) अन्वये विहित पात्रता असलेल्या अधिकाऱ्याला विनिर्दिष्ट अधिकारक्षेत्रात अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याची कार्ये करण्यासाठी अधिकृत करु शकेल.