Site icon Ajinkya Innovations

Esa 1908 कलम ५ : संशयायस्पद स्थितीत स्फोटके तयार करण्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल शिक्षा :

स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
कलम ५ :
संशयायस्पद स्थितीत स्फोटके तयार करण्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल शिक्षा :
जी कोणतीही व्यक्ती, कोणताही स्फोटक पदार्थ किंवा विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थ, तो कायदेशीर उद्दिष्टासाठी तयार करीत नाही किंवा स्वत:जवळ बाळगीत नाही किंवा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवीत नाही असा वाजवी संशय घेता येईल अशा परिस्थितीत तयार करील किंवा जाणीवपूर्वक स्वत:जवळ बाळगील किंवा ती स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवील त्याला, ती स्फोटके त्याने कायदेशीर उद्देशाने तयार केली किंवा बाळगली किंवा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवली असल्याचे तो दाखवू शकला नाही तर, पुढील शिक्षा होईल –
(a)(क)(अ) कोणत्याही स्फोटक पदार्थाच्या बाबतीत, दहा वर्षांपर्यंत कितीही असू शकेल, अशा मुदतीच्या कारावासाची शिक्षा आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल;
(b)(ख)(ब) कोणत्याही विशेष प्रवर्गातील स्फोटक पदार्थांच्या बाबतीत, आजीव सश्रम कारावासाच्या शिक्षा, किंवा दहा वर्षांपर्यंत कितीही असू शकेल अशा मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. २००१ चा अधिनियम ५४ याच्या कलम २ अन्वये कलमे २ ते ५ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version