स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८
कलम ६ :
अपप्रेरकास शिक्षा :
जी कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये कोणत्याही अपराधासाठी पैशाचा पुरवठा करून, किंवा त्यासाठी याचना करून, जागा उपलब्ध करून देऊन, साहित्याचा पुरवठा करून, किंवा कोणत्याही रीतीने या अधिनियमाखाली गुन्हा घडवून आणण्यासाठी सल्ला देईल, साहाय्य करील, अपप्रेरणा देईल किंवा अपराधास सहायक होईल, अशा व्यक्तीस, त्या अपराधासाठी तरतूद केलेली शिक्षा देण्यात येईल.