Epa act 1986 कलम ७ : उद्योग, कार्यचालन इ. पार पाडणाऱ्या व्यक्तीने मानकांपेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणी प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
प्रकरण ३ :
पर्यावरणी प्रदूषणास प्रतिबंध, नियंत्रण आरि त्यांचा उपशम :
कलम ७ :
उद्योग, कार्यचालन इ. पार पाडणाऱ्या व्यक्तीने मानकांपेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणी प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे :
कोणताही उद्योग, कार्यचालन किंवा प्रक्रिया पार पाडणाऱ्या व्यक्तीने, घालून देण्यात येतील अशा मानकांपेक्षा अधिक प्रमाणात कोणत्याही पर्यावरण प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा निस्सारण करता कामा नये किंवा त्यास परवानगी देता कामा नये.

Leave a Reply