पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २२ :
अधिकारितेस आडकाठी :
या अधिनियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही शक्तीच्या अनुषंगाने किंवा केंद्र सरकारने किंवा कोणत्याही अन्य प्राधिकरणाने किंवा अधिकाऱ्याने, त्याच्या किंवा त्यांच्या या अधिनियमाखालील कामाच्या संबंधात केलेल्या कोणत्याही कृतीच्या किंवा कार्यवाहीच्या संबंधात किंवा काढलेला आदेशा किंवा दिलेला निदेश यांच्या संबंधात, कोणताही दावा किंवा कार्यवाही विचारार्थ स्वीकारण्याची अधिकारिता कोणत्याही दिवाणी न्यायालयाला असणार नाही.