पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २१ :
कलम ३ अन्वये घटित केलेल्या प्राधिकरणाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक असणे :
कलम ३ अन्वये कोणतेही प्राधिकरण घटित केले असल्यास त्या प्राधिकरणाचे सर्व सदस्य आणि अशा प्राधिकरणाचे सर्व अधिकारी व अन्य कर्मचारी हे, ते जेव्हा, या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधानुसार आणि त्याखाली केलेल्या नियमांनुसार किंवा काढलेल्या आदेशानुसार किंवा दिलेल्या निदेशांनुसार कारवाई करत असतील किंवा कारवाई करत असल्याचे दिसत असेल तेव्हा, ते भारतीय दंड संहिता, १८६० (१८६० चा ४५) याच्या कलम २१ च्या अर्थांतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.