पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम १९ :
अपराधांची दखल :
(a) (क) केंद्र सरकार किंवा त्या शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी, किंवा
(b) (ख) केंद्र सरकारला किंवा उपरोक्तप्रमाणे प्राधिकृत केलेल्या प्राधिकाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला अभिकथित अपराधविषयी आणि तक्रार करणाऱ्या आपल्या उद्देशाविषयी विहित पद्धतीने कमीत कमी साठ दिवसांची नोटीस देणारी कोणतीही व्यक्ती, यांची तक्रार केली असेल त्याखेरीज, कोणतेही न्यायालय या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची दखल घेणार नाही.