Epa act 1986 कलम १८ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
प्रकरण ४ :
संकीर्ण :
कलम १८ :
सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :
जी गोष्ट या अधिनियमानुसार किंवा त्याखाली केलेल्या नियमानुसार किंवा काढलेले आदेश किंवा निदेश यानुसार सद्भावपूर्वक केलेली आहे किंवा करण्याचे उद्देशित आहे अशा कोणत्याही गोष्टीबद्दल शासनाविरूद्ध किंवा शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याविरूद्ध किंवा इतर कर्मचाऱ्याविरूद्ध किंवा या अधिनियमान्वये घटित केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाविरूद्ध किंवा अशा प्राधिकरणाच्या कोणत्याही अधिकाऱ्याविरूद्ध किंवा अन्य कर्मचाऱ्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य वैध कार्यवाही करता येणार नाही.

Leave a Reply