हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ४ :
१.(हुंडा मागण्याबद्दल शास्ती :
कोणत्याही व्यक्तीने,वधूच्या किंवा वराच्या मातापित्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून किंवा पालकांकडून, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागितल्यास ती सहा महिन्यांपेक्षा कमी नसेल पण दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या आणि दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल :
परतुं, न्यायालय न्यायनिर्णयात पुरेश व विशेष कारणांचा उल्लेख करुन, सहा महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या कारावासाची शिक्षा ठोठावू शकेल.)
——–
१. १९८४ चा अधिनियम अधिनियम ६३ याच्या कलम ४ द्वारा कलम ४ ऐवजी (२-१०-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.