हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ३ :
हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शास्ती :
१.(१)) जर कोणत्याही व्यक्तीने, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, हुंडा दिला अथवा घेतला अथवा तो देण्यास किंवा घेण्यास अपप्रेरणा दिली तर ती २.(३.(पाच वर्षापेक्षा) कमी नसेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या आणि पंधरा हजार रुपये किंवा अशा हुंड्याची रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या) शिक्षेस पात्र असेल :
परतुं, न्यायालय न्यायनिर्णयात पुरेशी व विशेष कारणे नमूद करुन ४.(पाच वर्षापेक्षा) कमी मुदतीची कारावासाची शिक्षा ठोठावू शकेल.
५.(२) पोटकलम (१) मधील कोणताही मजकूर पुढील गोष्टींना किंवा त्यांच्या संबंधात लागू होणार नाही :-
(a)क)(अ) विवाहाच्या वेळी वराला देण्यात येणारा ( त्याबाबतीत कोणतीही मागणी न केलेला ) अहेर :
परंतु, असा अहेर, या अधिनियमाखाली केलेल्या नियमांस अनुसरुन ठेवण्यात येणाऱ्या यादीत नोंदलेला असेल.
(b)ख)(ब) विवाहाच्या वेळी वधूला देण्यात येणारा (त्या बाबतीत कोणतीही मागणी न केलेला) अहेर :
परंतु असा अहेर या अधिनियमाखाली केलेल्या नियमांस अनुसरूण ठेवण्यात येणाऱ्या यादीत नोंदलेला असेल :
परंतु आणखी असे की, असा अहेर वराने किंवा त्यांच्या वतीने किंवा वराशी संबंधित कोणाही व्यक्तीने दिलेला असेल त्या बाबतीत, असा अहेर नेहमीच्याच प्रथेनुसार दिला जाणारा असेल आणि त्याचे मूल्य तो जिच्याकडून किंवा जिच्या वतीने दिला जाईल, त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती विचारात घेता, अधिक असणार नाही.)
——–
१. १९८४ चा अधिनियम क्रमाकं ६३ याच्या कलम ३ द्वारे कलम ३ ला पोटकलम (१) असा नवीन क्रमांक (२-१०-१९८५ पासून) देण्यात आला.
२. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३ द्वारे मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३ द्वारे मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
४. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ३ द्वारे सहा महिने या मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
५. १९८४ चा अधिनियम अधिनियम ६३ याच्या कलम ३ द्वारा (२-१०-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.