Site icon Ajinkya Innovations

Cotpa कलम १८ : ताब्यात घेतलेल्या पुडक्यांच्या मालकाला संधी देणे :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम १८ :
ताब्यात घेतलेल्या पुडक्यांच्या मालकाला संधी देणे :
(१) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यांचा मालक किंवा ते कब्जात असलेली व्यक्ती यांना, ज्या कारणाने असे पुडके जप्त करण्याचे प्रस्तावित केले आहे त्या कारणाबाबत लेखी स्वरूपात माहिती देणारी नोटीस देण्यात आल्याखेरीज, आणि त्या नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वाजवी कालावधीत, जप्त करण्याच्या विरोधात लेखी निवेदन करण्याची वाजवी संधी त्यांना दिल्याखेरीज आणि जर त्यांची इच्छा असल्यास, व्यक्तिश: किंवा त्याच्या प्रतिनिधीमार्फत त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याखेरीज, ते पुडके जप्त करण्याचा न्यायनिर्णय देणारा आदेश किंवा किंमत चुकती करण्याचा निदेश देणारा आदेश काढण्यात येणार नाही :
परंतु, सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांचे पुडके ताब्यात घेतल्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या कालावधीच्या आत जर, अशी नोटीस दिली नाही तर, असे पुडके मालकाला किंवा जिच्या कब्जातून ताब्यात घेतले होते त्या व्यक्तीला त्या कालावधीच्या समाप्तीनंतर परत करण्यात येईल.
(२) पोटकलम (१) मध्ये तरतूद केली आहे त्या व्यतिरिक्त, दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) च्या तरतुदी शक्य असेल तेथवर, पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या प्रत्येक कार्यवाहीस लागू असतील.

Exit mobile version