Site icon Ajinkya Innovations

Cotpa कलम १५ : जप्त केले जाण्याऐवजी किंमत चुकती करण्याचा पर्याय देण्याचा अधिकार :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम १५ :
जप्त केले जाण्याऐवजी किंमत चुकती करण्याचा पर्याय देण्याचा अधिकार :
(१) जेव्हा जेव्हा सिगारेटचे किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनाचे कोणतेही पुडके जप्त करणे हे या अधिनियमाद्वारे प्राधिकृत केले असेल तेव्हा, तसा न्यायनिर्णय देणाऱ्या न्यायालयाला, जप्त करण्याच्या न्यायनिर्णय देणाऱ्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तींना अधीन राहून, त्या पुडक्याच्या मालकास पुडके जप्त केले जाण्याऐवजी, त्या मालाच्या मूल्याइतकी किंमत चुकती करण्याचा पर्याय देता येईल.
(२) न्यायालयाने आदेश दिलेली किंमत चुकती केल्यानंतर ज्या व्यक्तीकडून सिगारेटचे किंवा इतर तंबाखू उत्पादनांचे असे पुडके ताब्यात घेतले होते ती व्यक्ती, त्या पुडक्याचे कोणतेही वितरण, विक्री किंवा पुरवठा करण्यापूर्वी अशा प्रत्येक पुडक्यावर वैधानिक इशारा आणि निकोटिन व टार पदार्थ सूचक मजकूराचा समावेश करून घेईल, या अटींवर ते पुडके त्या व्यक्तीला परत करण्यात येईल.

Exit mobile version