Cotpa कलम ८ : वैधानिक इशारा तयार करावयाची रीत :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ८ :
वैधानिक इशारा तयार करावयाची रीत :
(१) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यावरील वैधानिक इशारा हा, –
(a)(क) सुवाच्च आणि ठळक असेल;
(b)(ख) आकार व रंगाने नजरेत भरणारा असेल;
(c)(ग) पुडक्यावर किंवा त्याच्या लेबलवर वापरलेली अन्य प्रकारची मुद्राक्षरे, अक्षरशैली किंवा रेखाचित्रीय मजकूर यापेक्षा ठळकपणे व स्पष्टपणे वेगळा उठून दिसेल अशा शैलीत किंवा मुद्राक्षरात प्रदर्शित केलेला असेल आणि पुडक्याच्या किंवा त्याच्या लेबलच्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर नजरेत भरतील अशा रंगात तो छापलेला, रंगवलेला किंवा कोरलेला असेल.
(२) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या पुडक्यावरील वैधानिक इशारा छापण्याची, रंगवण्याची किंवा कोरण्याची रीत या अधिनियमाखाली तयार केलेल्या नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशी असेल.
(३) सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनाचा समावेश असणारे प्रत्येक पुडके अशा रीतीने आवेष्टित करण्यात येईल की, जेणेकरून पुडके उघडण्यापूर्वी त्यावर किंवा त्याच्या लेबलवर असलेला वैधानिक इशारा ग्राहकांच्या दृष्टीस पडेल.

Leave a Reply