सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ३३ :
निरसन व व्यावृत्ती :
(१) सिगारेट (उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांचे विनियमन) अधिनियम, १९७५ (१९७५ चा ४९) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
(२) असे निरसन झाले असले तरीही, उपरोक्त अधिनियमाच्या तरतुदींअन्वये करण्यात आलेली कोणतीही गोष्ट किंवा केलेली कोणतीही कारवाई ही, जेथवर ती या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसेल तेथवर, अशी कोणतीही गोष्ट किंवा केलेली कारवाई करण्यात आली तेव्हा, जणू काही उक्त तरतुदी अंमलात होत्या असे मानून, या अधिनियमान्वये केलेली गोष्ट किंवा कारवाई असल्याचे मानण्यात येईल आणि या अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे किंवा कारवाईमुळे ती निष्प्रभावित होईपर्यंत ती अंमलात असण्याचे चालू राहील.