सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २३ :
जाहिरात व जाहिरातीची सामग्री सरकार जमा करणे :
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा कलम ५ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल या अधिनियमाखाली दोष सिद्ध झाला असेल तेव्हा सिगारेटची व इतर तंबाखू उत्पादनांची जाहिरातीची व जाहिरातीची सामग्री शासन सरकारजमा केली जाऊ शकेल आणि अशी जाहिरात व जाहिरातीची सामग्री या अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात येईल अशा रीतीने निकालात काढली जाईल.