Cotpa कलम १४ : पुडके जप्त करणे :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम १४ :
पुडके जप्त करणे :
सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या ज्या कोणत्याही पुडक्यांच्या संबंधात किंवा सिगारेटच्या किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांच्या ज्या कोणत्याही जाहिरातीच्या साहित्याच्या संबंधात, या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले असेल किंवा करण्यात येत असेल तर, ते पुडके किंवा ते साहित्य जप्त केले जाण्यास पात्र असेल :
परंतु, जेव्हा असा जप्त करण्याचा न्यायनिर्णय देणाऱ्या न्यायालयाचे समाधान होईल अशा रीतीने असे सिद्ध करण्यात येईल की, असे कोणतेही सिगारेटचे किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांचे पुडके ज्या व्यक्तीच्या कब्जात, अधिकारात किंवा नियंत्रणात असल्याचे आढळून आले आहे ती व्यक्ती, या अधिनियमाच्या तरतुदींच्या उल्लंघनास जबाबदार नाही तेव्हा, असे न्यायालय त्या पुडक्यांच्या जप्तीबाबतचा आदेश काढण्याऐवजी त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे, या अधिनियमाच्या तरतुदींच्या उल्लंघनासाठी दोषी असणाऱ्या व्यक्तींच्या विरूद्ध या अधिनियमाअन्वये प्राधिकृत केलेला असा अन्य आदेश देईल.

Leave a Reply