Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद ३०४ : राज्या-राज्यांमधील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर निर्बंध :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३०४ :
राज्या-राज्यांमधील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर निर्बंध :
अनुच्छेद ३०१ किंवा अनुच्छेद ३०३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राज्याच्या विधानमंडळाला कायद्याद्वारे,
(क) अन्य राज्ये १.(किंवा संघ राज्यक्षेत्रे ) यांमधून आयात केलेल्या मालावर, त्या राज्यात निर्मिलेला किंवा उत्पादित केलेला त्यासारखा माल ज्या करास पात्र असेल असा कोणताही कर अशा प्रकारे बसवता येईल की, जेणेकरून असा आयात केलेला माल आणि असा निर्मित किंवा उत्पादित माल यांच्यामध्ये भेदभाव होणार नाही, आणि
(ख) त्या राज्याशी किंवा राज्यामध्ये होणारा व्यापार, वाणिज्य किंवा व्यवहारसंबंध यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे वाजवी निर्बंध घालता येतील :
परंतु असे की, खंड (ख) च्या प्रयोजनार्थ कोणतेही विधेयक किंवा सुधारणा, राज्याच्या विधानमंडळात राष्ट्रपतीच्या पूर्वमंजुरीशिवाय प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही.
————
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे समाविष्ट केले.

Exit mobile version