Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद २६६ : भारताचे आणि राज्यांचे एकत्रित निधी व लोक लेखे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २६६ :
भारताचे आणि राज्यांचे एकत्रित निधी व लोक लेखे :
(१) अनुच्छेद २६७ च्या तरतुदींना आणि विवक्षित कर व शुल्के यांचे निव्वळ उत्पन्न पूर्णत: किंवा अंशत: राज्यांना नेमून देण्याबाबतच्या या प्रकरणाच्या तरतुदींना अधीन राहून, भारत सरकारला मिळालेला सर्व महसूल, त्या सरकारने राजकोष पत्रे, कर्जे किंवा अर्थोपाय अग्रिमे काढून उभारलेली सर्वे कर्जे आणि कर्जाच्या परतफेडीदाखल त्या सरकारला सर्व पैसा मिळून भारताचा एकत्रित निधी या नावाचा एक एकत्रित निधी तयार होईल, आणि राज्य शासनाला मिळालेला सर्व महसूल, त्या शासनाने राजकोष पत्रे, कर्जे, किंवा अर्थोपाय अग्रिमे काढून उभारलेली सर्व कर्जे आणि कर्जाच्या परतफेडीदाखल त्या शासनाला मिळालेला सर्व पैसा मिळून राज्याचा एकत्रित निधी या नावाचा एक एकत्रित निधी तयार होईल.
(२) भारत सरकारने किंवा राज्य शासनाने अथवा त्याच्या वतीने स्वीकारलेला अन्य सर्व सार्वजनिक पैसा, भारताच्या लोक लेख्यात, किंवा यथास्थिति, राज्याच्या लोक लेख्यात जमा करण्यात येईल.
(३) भारताच्या एकत्रित निधीतील किंवा राज्याच्या एकत्रित निधीतील कोणत्याही पैशांचे विनियोजन, ते कायद्याला अनुसरून असल्याखेरीज आणि या संविधानात तरतूद केलेल्या प्रयोजनांकरता व तशा रीतीने असल्याखेरीज, केले जाणार नाही.

Exit mobile version