Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद २४३-त : व्याख्या :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग ९-क :
१.(नगरपालिका :
अनुच्छेद २४३-त :
व्याख्या :
या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर,—–
(क) समिती याचा अर्थ, अनुच्छेद २४३-ध अन्वये घटित केलेली समिती, असा आहे ;
(ख) जिल्हा याचा अर्थ, एखाद्या राज्यातील जिल्हा, असा आहे ;
(ग) महानगर क्षेत्र याचा अर्थ, या भागाच्या प्रयोजनासाठी महानगर क्षेत्र म्हणून जाहीर अधिसूचनेद्वारे राज्यपालाने विनिर्दिष्ट केलेले दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेले, एक किंवा अधिक जिल्हे समाविष्ट असलेले आणि दोन किंवा अधिक नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर लगतचे क्षेत्र मिळून बनलेले क्षेत्र, असा आहे ;
(घ) नगरपालिका क्षेत्र याचा अर्थ, राज्यपालाने अधिसूचित केले असेल असे नगरपालिकेचे प्रादेशिक क्षेत्र, असा आहे ;
(ङ) नगरपालिका याचा अर्थ, अनुच्छेद २४३-थ अन्वये घटित केलेली स्वराज्य संस्था, असा आहे ;
(च) पंचायत याचा अर्थ, अनुच्छेद २४३-ख अन्वये घटित केलेली पंचायत असा आहे ;
(छ) लोकसंख्या याचा अर्थ, जिची संबद्ध आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असेल अशा लगतपूर्वीच्या जनगणनेद्वारे निश्चित करण्यात आलेली लोकसंख्या, असा आहे.
————–
१. संविधान (चौऱ्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९२ याच्या कलम २ द्वारे हा भाग समाविष्ट करण्यात आला (दिनांक १ जून १९९३ रोजी व तेव्हापासून).

Exit mobile version