Site icon Ajinkya Innovations

Constitution अनुच्छेद २२३ : कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २२३ :
कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती :
जेव्हा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीचे पद रिक्त असेल अथवा असा कोणताही मुख्य न्यायमूर्ती अनुपस्थितीच्या कारणामुळे किंवा अन्यथा आपल्या पदाच्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असेल तेव्हा, त्या पदाची कर्तव्ये, त्या न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी ज्या एकाची, राष्ट्रपती, त्या प्रयोजनाकरता नियुक्ती करील, तो न्यायाधीश पार पाडील.

Exit mobile version