Constitution अनुच्छेद ६० : राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६० :
राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे :
प्रत्येक राष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून कार्य करणारी किंवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती, आपले पद ग्रहण करण्यापूर्वी, भारताच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष किंवा तो अनुपस्थित असेल तर, सर्वोच्च न्यायालयाच्या उपलब्ध ज्येष्ठतम न्यायमूर्तीच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील, ती म्हणजे अशी—-
——— ईश्वरसाक्ष शपथ घेतो की,——–
मी, क.ख. —————-मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे
——–गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो.——
निष्ठापूर्वक कार्यपालन करीन (किंवा मी भारताच्या राष्ट्रपतीची कार्ये पार पाडीन) आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन, रक्षण व संरक्षण करीन आणि मी स्वत:ला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईन.

Leave a Reply