भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५४ :
राष्ट्रपतीची निवडणूक :
राष्ट्रपती,—-
(क) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य ; आणि
(ख) राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य ;
यांनी मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून, निवडला जाईल.
१.(स्पष्टीकरण :
या अनुच्छेदातील आणि अनुच्छेद ५५ मधील, राज्य यात, दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र आणि *पाँडिचेरीचे संघ राज्यक्षेत्र यांचा समावेश आहे.)
———————
१. संविधान (सत्तरावी सुधारणा) अधिनियम, १९९२ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केले (१ जून १९९५ रोजी व तेव्हापासून).
*पाँडेचरी (नामांतर) अधिनियम, २००६ याच्या कलम ३ द्वारे आता पुडुचेरी असे नाव आहे (१ ऑक्टोबर २००६ रोजी व तेव्हापासून).