Constitution अनुच्छेद ३९४-क : हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३९४-क :
१.(हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ :
(१) राष्ट्रपती आपल्या प्राधिकारान्वये,——
(क) संविधान सभेच्या सदस्यांनी, स्वाक्षरित केलेल्या, केंद्रीय अधिनियमाच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठामध्ये अंगीकृत केलेली भाषा, शैली व परिभाषा यांच्याशी अनुरूप करण्यासाठी आवश्यक असतील असे फेरबदल केलेला आणि अशा प्रसिद्धीपूर्वी ह्या संविधानामध्ये केलेल्या सर्व सुधारणा त्यामध्ये समाविष्ट केलेला या संविधानाचा हिंदी भाषेतील अनुवाद; आणि
(ख) या संविधानाच्या इंग्रजी भाषेमध्ये केलेल्या प्रत्येक सुधारणेचा हिंदी भाषेतील अनुवाद, प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करील.
(२) खंड (१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संविधानाच्या आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेच्या अनुवादास, त्याचा जो मूळ अर्थ असेल त्याप्रमाणे, अन्वयार्थ लावण्यात येईल आणि जर अशा अनुवादाच्या कोणत्याही भागाचा अन्वयार्थ लावण्यामध्ये कोणतीही अडचण उद्भवली तर, राष्ट्रपती, त्यांचे योग्यप्रकारे पुनरीक्षण करण्याची व्यवस्था करील.
(३) या अनुच्छेदामध्ये प्रसिद्ध केलेला या संविधानाचा आणि त्याच्या प्रत्येक सुधारणेचा अनुवाद, हा सर्व प्रयोजनांकरता त्याचा हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ असल्याचे मानण्यात येईल.)
———–
१. संविधान (अठ्ठावन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८७ याच्या कलम ३ द्वारे समाविष्ट केला.

Leave a Reply