Constitution अनुच्छेद ३७७ : भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याच्यासंबंधीच्या तरतुदी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३७७ :
भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याच्यासंबंधीच्या तरतुदी :
या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी पद धारण करत असलेला भारताचा महा लेखापरीक्षक, त्याने अन्य पर्याय निवडलेला नसल्यास, अशा प्रारंभानंतर, भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक होईल आणि तद्नंतर अनुच्छेद १४८ च्या खंड (३) अन्वये भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याबाबत तरतूद करण्यात आलेले वेतन व अनुपस्थिति रजा व पेन्शन यांबाबतचे हक्क यांना हक्कदार होईल आणि अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी त्याला ज्या लागू होत्या त्या तरतुदींन्वये ठरवण्यात आल्याप्रमाणे त्याचा पदावधी संपेपर्यंत पद धारण करण्याचे चालू ठेवण्याचा त्याला हक्क असेल.

Leave a Reply