भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३७१-छ :
१.(मिझोरम राज्याबाबत विशेष तरतूद :
संविधानात काहीही असले तरी,——
(क) (एक) मिझोंच्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथा,
(दोन) मिझोंचा रूढीप्राप्त कायदा व कार्यपद्धती,
(तीन) मिझोंच्या रूढीप्राप्त कायद्यानुसार निर्णय देणे हे ज्यात अनुस्युत आहे, असे दिवाणी व फौजदारी न्यायदान,
(चार) जमिनीची मालकी व हस्तांतरण, यांबाबतचा संसदेचा कोणताही अधिनियम, मिझोरमच्या विधानसभेने ठरावाद्वारे तसे ठरविल्याशिवाय मिझोरम राज्याला लागू होणार नाही :
परंतु असे की, या खंडातील कोणतीही गोष्ट, संविधान (त्रेपन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८६ याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी मिझोरमच्या संघ राज्यक्षेत्रात अंमलात असलेल्या कोणत्याही केंद्रीय अधिनियमाला लागू होणार नाही ;
(ख) मिझोरम राज्याची विधानसभा, चाळीसपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल.)
———
१. संविधान (त्रेपन्नावी सुधारणा) अधिनियम, १९८६ यांच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला (२० फेब्रुवारी १९८७ रोजी व तेव्हापासून).