भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३४ :
कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध :
या भागाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी, भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जेथे लष्करी कायदा अंमलात होता अशा कोणत्याही क्षेत्रात सुव्यवस्था राखणे किंवा ती पूर्ववत प्रस्थापित करणे यासंबंधात संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे तिचे हानिरक्षण करू शकेल अथवा अशा क्षेत्रातील लष्करी कायद्याअन्वये दिलेला शिक्षादेश, केलेली शिक्षा, आदेशित समपहरण किंवा केलेली अन्य कृती विधिग्राह्य करू शकेल.