भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३४९ :
भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती :
या संविधानाच्या प्रारंभापासून पंधरा वर्षाच्या कालावधीन, अनुच्छेद ३४८ चा खंड (१) यात उल्लेखिलेल्यांपैकी कोणत्याही प्रयोजनांसाठी वापरावयाच्या भाषेबाबत तरतूद करणारे कोणतेही विधेयक किंवा सुधारणा, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहात, राष्ट्रपतीच्या पूर्वमंजुरीशिवाय प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही आणि राष्ट्रपतीने, अनुच्छेद ३४४ च्या खंड (१) अन्वये घटित केलेल्या आयोगाच्या शिफारशी व त्या अनुच्छेदाच्या खंड (४) अन्वये घटित केलेल्या समितीचा अहवाल विचारात घेतल्याखेरीज, राष्ट्रपती असे कोणतेही विधेयक प्रस्तुत करण्याला किंवा अशी कोणतीही सुधारणा मांडण्याला मंजुरी देणार नाही.