भारताचे संविधान ( राज्यघटना )
प्रकरण दोन :
प्रादेशिक भाषा :
अनुच्छेद ३४५ :
राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा :
अनुच्छेद ३४६ व ३४७ यांच्या तरतुदींना अधीन राहून, राज्याच्या विधानमंडळाला, राज्यामध्ये वापरात असलेल्या कोणत्याही एका किंवा अधिक भाषांचा किंवा हिंदीचा, त्या राज्याच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही शासकीय प्रयोजनांकरता वापरावयाची किंवा वापरावयाच्या भाषा म्हणून, कायद्याद्वारे अंगीकार करता येईल :
परंतु असे की, राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत, त्या राज्यात या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी ज्या शासकीय प्रयोजनांकरता इंग्रजी भाषा वापरली जात होती, त्या प्रयोजनांकरता तिचा वापर चालू राहील.