भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३३५ :
सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाति यांचे हक्क :
संघराज्य किंवा राज्य यांच्या कारभाराच्या संबंधातील सेवांमध्ये व पदांवर नियुक्ती करताना, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांमधील व्यक्तींच्या हक्कमागण्या, प्रशासनाच्या कार्यक्षमतेशी सुसंगत राखून विचारात घेतल्या जातील :
१.(परंतु असे की, संघराज्य किंवा राज्य यांच्या कारभाराच्या संबंधातील सेवांच्या कोणत्याही वर्गामध्ये किंवा वर्गांमध्ये किंवा पदांवर पदोन्नती देण्याच्या बाबतीत आरक्षण ठेवण्याकरिता, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांमधील व्यक्तींसाठी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली गुणमर्यादा शिथिल करण्याच्या दृष्टीने किंवा मूल्यमापनासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कोणतीही तरतूद करण्यासाठी या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही.)
———-
१. संविधान (ब्याऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००० याच्या कलम २ द्वारे हे परंतुक समाविष्ट केले.