भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३२१ :
लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार :
संसदेने, किंवा यथास्थिति, राज्य विधानमंडळाने केलेल्या अधिनियमाद्वारे, संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवांबाबतची आणि कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा कायद्याद्वारे घटित झालेल्या अन्य निगम निकायाच्या किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेच्या सेवांबाबतची संघ लोकसेवा आयोगाकडून किंवा राज्य लोकसेवा आयोगाकडून अतिरिक्त कार्ये पार पाडली जाण्यासाठी तरतूद करता येईल.