भारताचे संविधान ( राज्यघटना )
प्रकरण दोन :
प्रशासनिक संबंध :
सर्वसाधारण :
अनुच्छेद २५६ :
राज्ये व संघराज्य यांचे प्रतिदायित्व :
प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरला जाईल की, त्यायोगे, संसदेने केलेल्या कायद्यांचे आणि त्या राज्यात जे लागू असतील अशा कोणत्याही विद्यमान कायद्यांचे पालन सुनिश्चित होईल आणि त्या प्रयोजनाकरता भारत सरकारला आवश्यक वाटतील असे निदेश राज्याला देणे हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल.