भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यण :
सदस्यांचा माहिती मिळवण्याचा अधिकार :
१) राज्य विधान मंडळास, सहकारी संस्थेने तिच्या सदस्यांबरोबर नियमित कामकाज करताना ठेवलेली पुस्तके, माहिती, लेखे, त्या सहकारी संस्थेच्या प्रत्येक सदस्याला पाहवयास मिळण्याची तरतूद कायद्याद्वारे करता येईल.
२) राज्य विधान मंडळास कायद्याद्वारे, सदस्यांची किमान आवश्यकता उपस्थिती यासंबंधात तरतूद करुन सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये सदस्यांच्या सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि अशा कायद्यात तरतूद करण्यात येईल अशा किमान स्थरावरील सेवांचा वापर करण्यासाठी तरतूद करण्यात येईल.
३) राज्य विधान मंडळास, कायद्याद्वारे, सहकारी संस्थांच्या सदस्यांसाठी सहकार शिक्षणाची व प्रशिक्षणाची तरतूद करता येईल.