भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-फ :
सदस्यत्वाबाबत अपात्रता :
(१) एखादी व्यक्ती, एखाद्या नगरपालिके ची सदस्य म्हणून निवडली जाण्यास किंवा सदस्य असण्यास, पुढील बाबतीत अपात्र असेल,-
(क) संबंधित राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये तिला अशा प्रकारे अपात्र ठरविण्यात आलेले असेल तर :
परंतु असे की, कोणत्याही व्यक्तीस, तिने वयाची एकवीस वर्षे पूर्ण केलेली असल्यास, ती पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, या कारणास्तव अपात्र ठरवण्यात येणार नाही ;
(ख) राज्य विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये तिला अशा प्रकारे अपात्र ठरवण्यात आलेले असेल तर,
(२) नगरपालिकेचा एखादा सदस्य, खंड (१) मध्ये नमूद केलेल्या अपात्रतांपैकी कोणत्याही अपात्रतेस अधीन झाला आहे किंवा कसे याबाबत कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास, तो प्रश्न, राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे तरतूद करील अशा प्राधिकाऱ्याकडे व अशा रीतीने निर्णयार्थ सोपविण्यात येईल.