भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २२० :
१.(स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध :
जिने या संविधानाच्या प्रारंभानंतर एखाद्या उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशाचे पद धारण केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, सर्वोच्च न्यायालय व इतर उच्च न्यायालये याखेरीज भारतातील कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्यासमोर वकिली करता किंवा काम चालवता येणार नाही.
स्पष्टीकरण :
या अनुच्छेदातील उच्च न्यायालय या शब्दप्रयोगात, संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या २.(प्रारंभापूर्वी )अस्तित्वात असलेल्या पहिल्या अनुसूचीतील भाग ख मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा समावेश नाही.)
———–
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम १३ द्वारे मूळ अनुच्छेद २२० ऐवजी दाखल केला.