भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १९३ :
अनुच्छेद १८८ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती :
जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद १८८ च्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यापूर्वी, अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाला आपण पात्र नाही किंवा अपात्र झालो आहोत किंवा संसदेने अगर त्या राज्याच्या विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींद्वारे त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्याची किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे, हे माहीत असताना तसे केले तर, ज्या ज्या दिवशी ती व्यक्ती स्थानापन्न झाली असेल किंवा तिने मतदान केले असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल पाचशे रुपये इतक्या शास्तीस ती पात्र होईल व ती शास्ती राज्याला येणे असलेले ऋण म्हणून वसूल केली जाईल.