भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १३५ :
विद्यमान कायद्याअन्वये फेडरल न्यायालयाची अधिकारिता व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरणे :
संसद, कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत, जिला अनुच्छेद १३३ किंवा अनुच्छेद १३४ च्या तरतुदी लागू होत नाहीत अशा कोणत्याही बाबीविषयीची अधिकारिता व अधिकार जर या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कोणत्याही विद्यमान कायद्याअन्वये फेडरल न्यायालयाद्वारे वापरण्यायोग्य असतील तर, त्या बाबीविषयीची अधिकारिता व अधिकार सर्वोच्च न्यायालयासही असतील.