Site icon Ajinkya Innovations

Child labour act कलम १९ : नियम आणि अधिसूचना संसद किंवा विधान-मंडळासमोर ठेवणे :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १९ :
नियम आणि अधिसूचना संसद किंवा विधान-मंडळासमोर ठेवणे :
१) केन्द्र सरकार या अधिनियमाखाली केलेला प्रत्येक नियम आणि कलम ४ अन्वये काढण्यात आलेली प्रत्येक अधिसूचना, तो करण्यात आल्यानंतर किंवा ती काढण्यात आल्यानंतर, होईल तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमारे, ते एका सत्राने बनलेल्या अथवा दोन किंवा अधिक क्रमवर्ती सत्रे मिळून बनलेल्या एकूर तीस दिवसांच्या कालावधीकरिता सत्रासीन असताना ठेवली जाईल, आणि पूर्वोक्त सत्राच्या किंवा क्रमवर्ती सत्रांच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी, जर, त्या नियमात किंवा अधिसूचनेत कोणतेही आपरिवर्तन करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले अथवा तो नियम qकंवा करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे मतैक्य झाले तर, त्यानंतर तो नियम qकंवा अधिसूचना, अशा आपरिवर्तित रुपातच परिणामक होईल, किंवा, यथास्थिति, मुळीच परिणामक होणार नाही; तथापि, अशा कोणत्याही आपरिवर्तनामुळे किंवा शून्यीकरणामुळे, तत्पूर्वी त्या नियमाखाली किंवा अधिसूचनेखाली करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीचच्या विधिग्राह्यतेला बाध येणार नांही.
२) राज्य शासनाने या अधिनियमाखाली केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर, होईल तितक्या लवकर, त्या राज्याच्या विधानमंडळासमोर ठेवण्यात येईल.

Exit mobile version