Site icon Ajinkya Innovations

Child labour act कलम १८ : नियम करण्याचा अधिकार :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १८ :
नियम करण्याचा अधिकार :
१) समुतिच शासन, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी राजपत्रातीला अधिसूचनेद्वारे व पूर्वप्रकाशनाच्या शर्तींच्या अधीनतेने नियम करु शकेल.
२) विशेषकरुन व पूर्वगामी अधिकारांच्या व्यापकतेत बाध न येता, खालीलपैकी सर्व qकंवा कोणत्याही बाबींसाठी नियम करता येतील :-
(a)१.(क)(अ) कलम ३ च्या पोटकलम (२) च्या खंड (ख) अधीन अटी आणि संरक्षण उपाय आणि पोटकलम (२) चे स्पष्टीकरण चा खंड (ख) च्या अधीन इतर क्रियाकलाप;)
(b)२.(ख)(ब) ३.(तंत्र सल्लागार समितीचे) अध्यक्ष व सदस्य यांची पदावधी, त्यांच्या नैमित्तिक रिक्त जागा भरण्याची पद्धत आणि त्यांना देय असणारे भत्ते, आणि कलम ५ च्या पोटकलम (५) अन्वये, ज्या शर्ती व निर्बंध यांच्या अधीनतेने एखाद्या उप समितीवर सदस्येतर व्यक्तींची नियुक्ती करता येईल, त्या शर्ती व निर्बंध;)
(c)४.(ग)(क) कलम ७ च्या पोटकलम (१) अन्वये जितके तास १.(किशोराला), कामे करणे आवश्यक करण्यात येईल किंवा काम करण्याची परवानगी देण्यात येईल ते तास;)
(d)६.(घ)(ड) नोकरीवर असलेल्या किंवा कामाच्या शोधात असलेल्या तरुण व्यक्तींच्या संबंधात वयाचे प्रमाणपत्र देणे, अशी प्रमाणपत्रे देऊ शकणारी वैद्यकीय प्राधिकरणे, अशा प्रमाणपत्राचा नमुना, त्याबद्दल आकारता येईल ते शुल्क व ज्या रीतीने अशी प्रमाणपत्रे देता येतील ती रीत :
परंतु, अर्जासोबत जर संबंधित प्राधिकरणाने समाधानकारक मानलेला असा वयाचा पुरावा असेल तर, असे कोणतेही प्रमाणपत्र देण्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही;)
(e)७.(ङ)(इ) कलम ११ खाली ठेवावयाच्या नोंदवहीत अंतर्भूत करावयाचा तपशील;)
(f)८.(च)(फ) कलम १४ ख च्या पोटकलम (४) अंतर्गत बालक किंवा किशोर यांना रक्कम देण्याची पद्धत;
(g)छ)(ग) कलम १४घ च्या पोटकलम (१) अंतर्गत अपराधाचे शमन करण्याची पद्धत आणि समुचित शासनास रक्कम जमा करण्याची पद्धत;
(h)ज)(ह) कलम १७क अन्वये निर्दिष्ट केलेले अधिकारी किंवा वापरले जाणारे अधिकार आणि पार पाडली जाणारी कर्तव्ये आणि जिथे असे अधिकार वापरले जातील आणि अशी कर्तव्ये जेथे पार पाडली जातील त्या स्थानीक सीमा.)
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा समाविष्ट केले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा खंड (क) ला खंड (ख) म्हणून पुन:संख्यांकित केले.
३. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा पुन:संख्यांकित खंड (ख) मध्ये बाल कामगार तंत्र सल्लागार समिती याऐवजी समाविष्ट केले.
४. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा खंड (ख) ला खंड (ग) म्हणून पुन:संख्यांकित केले.
५. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा पुन:संख्यांकित खंड (ग) मध्ये बालक याऐवजी समाविष्ट केले.
६. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा खंड (ग) ला खंड (घ) म्हणून पुन:संख्यांकित केले.
७. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा खंड (घ) ला खंड (ङ) म्हणून पुन:संख्यांकित केले.
८. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम २१ द्वारा पुन:संख्यांकित खंड (ङ) नंतर समाविष्ट केले.

Exit mobile version